तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचा विशेषता ग्रामीण भागाचा मुड मोदी शहा यांना बदलण्याचा आहे. याची धग निश्चीत या निवडणुकीत बसणारच असे स्पष्ट करुन भाजप ने दहा वर्षाचा सत्तेचा लेखाजोखा मांडावा असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी तुळजापूर येथे पञकार परिषदेत केले.

यावेळी पञकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले कि, महाराष्ट्रातील मोदी शहाचे भाषणे बघा यांच्या कडे विकास कामांनवर बोलण्यासारखे काहीही नाही म्हणून  फक्त पवार, ठाकरे वर टीका करीत आहे. टीका करा पण तुम्ही दहा वर्ष सत्तेवर आहात. या दहा वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा असे आवाहन केले. महाराष्ट्र राज्याच्या मुड कसा आहे असे विचारताच ते म्हणाले कि, राज्यात महागाई बेरोजगारी प्रमुख मुद्दे आहेत. त्यामुळे खास करुन ग्रामीण भागातील जनतेनी मोदींना बदलण्याचा निर्णय घेतल्याने त्याची धग या निवडणुकीत मोदी, शहांना निश्चित बसेल असे यावेळी म्हणाले. माणुसवाला तुतारी व सिंगल  तुतारी याचा फटका सातारात शशीकांत शिंदेना बसेल का असे विचारताच यामुळे मतदारात संभ्रमावस्था  निर्माण होवु नये  एवढेच आमचे म्हणणे आहे. पण निवडणुक आयोगाचा निर्णय आहे तो मान्यच करावा लागेल असे यावेळी म्हणाले. कालच्या जाहीर सभेत आपल्या जुने सहकारी डाँ पदमसिंह पाटील बद्दल खंत व्यक्त केली. विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले कि, उस्मानाबादला डॉ. पदमसिंह पाटील व लातुरला विलासराव देशमुख यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या दोन्ही ठिकाणचे एक वैशिष्ट्ये आहे.  यात विलासरावांना पेक्षा अधिक काळ संधी डॉ. पदमसिंह पाटलांना मिळाली. आज विकासाबाबतीत  लातुर कुठे, उस्मानाबद कुठे आहे. मिळालेल्या व दिलेल्या संधीचा वापर व जबाबदारी आपल्या विभागासाठी संबंधित नेत्याने घेणे गरजेचे असते असा डाँ पाटील यांचे नाव न घेता विकासाबाबतीत धाराशिव जिल्हा मागे आहे दर्शवून देवुन यासाठी पाटील परिवार जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हणाले. या वेळी उमेदवार ओम राजेनिंबाळकर उपस्थितीत होते.


 
Top