तुळजापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बुधवार दि. 23 रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येताच सांयकाळी प्रथम श्रीतुळजाभवानी मंदिर राजमाता म़ाँ जिजाऊ महाध्दारातुनच श्रीतुळजाभवानी मातेस साडीचोळी अर्पण करुन खणानारळाने ओटी भरुन श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. मग सभा स्थळी रवाना झाले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी पवार यांनी केले. यावेळी उमेदवार खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जीवन गोरे, अमोल कुतवळ, धिरज पाटील रुषीकेश मगर उपस्थितीत होते.

 

तिर्थक्षेञ तुळजाई नगरीत पवारांचे चौदा तास वास्तव्य !

लोकसभा निवडणुकच्या महत्वपुर्ण कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  अध्यक्ष शरद पवार जवळपास चौदा तास तिर्थक्षेञ तुळजापूरात वास्तव्यास होते.

त्यामुळे या वास्तव्यात तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीतुन राज्यातील काय राजकिय हालचाली केल्या हे लवकरच स्पष्ट होणार आहे. उस्मानाबाद जिल्हा दौरावर आले कि, शरदचंद्र पवार जास्तीत जास्त कालावधीत वास्तव्य ते तिर्थक्षेञ तुळजाई नगरीत करीत. येथे बसुनच जिल्हयाची सर्व माहिती नेते, अधिकारी यांच्याकडुन घेवुन मगच अधिकारी, नेत्यांना सुचना करीत. पुर्वी ते शासकीयरेस्ट हाऊस वर वास्तव्य करीत. आचार संहिता पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी ट्रॉयडंट हॉटेल येथे वास्तव केले.


 
Top