धाराशिव (प्रतिनिधी)-येथील नगर परिषदेच्य माजी नगराध्यक्षा पुष्पाताई पाटोदेकर (वय 87 वर्षे) यांचे दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

पुष्पाताई पाटोदेकर यांनी धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, भारत स्काऊट गाईडच्या जिल्हाध्यक्ष, महिला मंडळाच्या अध्यक्षा आदी विविध पदे भूषविलेली आहेत. तसेच त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री कपिलधारा स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक व सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या राज्याचे माजी गृहमंत्री व माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या मोठ्या बहिण होत्या. त्यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.


 
Top