तुळजापूर (प्रतिनिधी) - उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असुन  महायुतीत उमेदवारी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मिळाली असली तर भाजप माञ तन मन धनाने प्रचारात झटत असल्याचे दिसुन येत आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवार यांच्या प्रचारात जिल्हापरिषद विभाग  निहाय प्रचार यंञणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात भाजप च्या ग्रामीण भागातील प्रत्येक नेत्याला जिल्हा परिषद मतदार संघ प्रचारात वाटुन दिला आहे. ते मतदार संघ सांभाळत आहेत. त्यात ही सोबत आले तर महायुती घटक पक्षातील नेते मंडळी अन्यथा एकले चलो पध्दतीने प्रचार करीत असल्याचे दिसुन येत आहे. 

अर्चनाताई प्रचारात सर्वकाही उपलब्ध आहे. महायुती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट यांना विश्वासात घेतले जात नसल्याने ते प्रचारापासून आलिप्त दिसत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे एक दोन नेते प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे प्रचारावरुन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट गटबाजी दिसत आहे. तर महाविकास आघाडीतील सर्व नेते पदाधिकारी कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता मनाने प्रचारात उतरले आहेत. एकंदरीत  प्रचारात पुढील काळात काय होणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.


 
Top