धाराशिव (प्रतिनिधी)- अभिषेक बाबुराव मारवाडकर, वय 36 वर्षे, रा. शाहु नगर तावडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.03.02.2024 रोजी 08.30 ते 12.30 वा. सु  तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 24.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 35,000 असा एकुण 1 लाख 8 हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी  अभिषेक मारवाडकर यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे गुरनं 26/2024 कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणनेकामी धाराशिव जिल्हृयातील आंबी, भुम, वाशी व येरमाळा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान आंबी पोलीस ठाणे हद्दीत आले. पथकास गोपनीय माहिती मिळाली की, आंबी ते आनाळा रोडवर दोन इसम एक मोटर सायकलसह थांबलेले आहेत. त्यावर पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून बातमी प्रमाणे दोन इसम व एक मोटरसायकल सह मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले, वय 31 वर्षे रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहमदनगर,  शाम उत्तम पवार, वय 32 वर्षे, र. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड असे सांगीतले. त्यावर पथकाने नवनाथ भोसले याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली. त्यांनी प्रथमत: पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की मी व माझे तीन भाउ यांनी मागील दीड वर्षातील काळात माझे बजाज मोटरसायकलवरुन धाराशिव शहरात दिवसा बंद असलेले आनंदनगर पो. ठाणे गुरनं  26/2024 कलम 454, 380, पो. ठाणे भुम गुरनं 53/2024, 28/2023 कलम 454, 380, पो. ठाणे वाशी  02/2024 454, 380, 12/2024, 91/2024, 188/2023, 189/2023, 254/2023, 278/2023, 321/2023 कलम 454, 380, भा.दं.वि.सं.,  पो.ठाणे येरमाळा  85/2024 कलम 454, 380 भा.दं.वि.सं., पो.ठाणे आंबी  140/2023 कलम 454, 380 भा.दं.वि.सं. असे एकुण 13 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची मोटरसायकल 90 हजार रूपये किंमतीची हस्तगत केली. आरोपीस चोरीच्या मोटरसायकलसह आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस नमुद आरोपींचा शोध घेत आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फहरान पठाण, चालक नितीन भोसले, रत्नदिप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top