उमरगा (प्रतिनिधी)-महाविकास आघाडीचे धाराशिवचें उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उज्वल भवितव्य आहे. देशात  इंडिया आघाडीचे सरकार आल्यास त्याना चांगली संधी मिळणार असून त्याना प्रचंड मताधिक्यानेविजयी करा. देशात आमदार खासदारांना खरेदी केले जात आहे. आपण गद्दारी करणाऱ्याना धडा शिकवून न्याय द्यावा. जनतेच्या न्यायालयाने शिवसेना व राष्ट्रवादी कुणाची आहे हे मतदान करून दाखवून द्यावे असे आवाहन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले.

उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या वेळी ते बोलत होते व्यासपीठावर शिवसेना उबाठाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, कुणाल राऊत, युवक जिल्हा अध्यक्ष अश्लेष मोरे, विजयकुमार सोनवणे, अजिंक्य मोरे, संजय चालुक्य, विलास शाळू, अमर खानापुरे, रजाक अत्तार आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की,शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडला आमच्याही (काँग्रेसच्या) खिडक्या चोरल्या असून या चोरीला गेलेल्या खिडक्या परत आमच्याकडे नको अशी जनतेची ओरड होत आहे असे त्यानीं बसवराज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. 

या वेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील विकासासाठी मी केव्हांही कमी पडणार नाही जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील सदस्या सोबत माझे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. 

यावेळी अश्लेष मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. मोरे आणि देशमुख घराण्याचे ऋणानुबंध अनेक वर्षांपासून आहेत. आत्ता अश्लेष मोरे यांच्या रूपाने ते अधिक मजबूत होत असल्याचें सांगून देशमुख कायम मोरे यांच्या मागे असतील असे ते सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्तावित अँड. दिलीप सगर यांनी केले. सूत्रसंचालन संजय देशमुख (ढोणे) यांनी केले. आभार ॲड. एस. पी. इनामदार यांनी मानले.


 
Top