तुळजापुर (प्रतिनिधी)- खंडाळा येथील 350 वर्षापुर्वीची शिवकालिन परंपरा असलेल्या मानाच्या कावडी शिखर शिंगणापुर येथुन दर्शन करून परत येताना शंभुमहादेव देवस्थानच्या वतीने छञपती शिवरायांचे वंशज श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी पाठविलेला मानाचा आहेर शालु, दवणागोळी आई तुळजाभवानीला अर्पण करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिराचे महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, देविचे पुजारी धनंजय कदम पाटील व मंदिर कर्मचारी यांनी स्विकारला. यावेळी खंडाळा कावडीचे मानकरी पवार, लोखंडे, कोकाटे, जाधव, काकडे, धुमाळ, मोरे, वाघे, आदी उपस्थित होते.


 
Top