तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यात  पवनचक्की कंपन्यांनी पवनचक्यांना जाण्यासाठी लागणारा रस्ता करताना ते कुणाच्याही शेतातुन गायरान वनखाते जमिनीतुन  नेत आहेत. या मनमानीला शेतकरी सरकारी कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. तक्रार केली तर दलाल माध्यमातून दबाब टाकुन प्रकरण दाबत असल्याने बाधीत शेतकऱ्यांना तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. या पवनचक्या कंपनी ची मनमानी रोखण्याची मागणी ञस्त शेतकऱ्यांन मधुन केली जात आहे.


तालुक्यात पवनचक्या कंपन्यानी स्थानिक दलालांना हाताशी धरुन  अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तालुक्यांतील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  दलालांच्या संगनमताने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून जवळपास 30 वर्षांचा भाडेकरार करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून पवनचक्क्या उभारणीचे काम सुरू आहे.

 या पवन चक्यांना लागणारा रस्ता करताना कुणाच्याही शेतकऱ्यांच्या शेतातील वृक्ष तोडत आहेत. तसेच वन खाते, गायरान जमिनीतुन रस्ता नेत असुन हा रस्ता करताना अडवले तर शेतकऱ्यांन वर विविध मार्गाने दबाव टाकत आहेत. तिर्थब्रु, तिर्थ खुर्द  हद्दीवर  या पवनचक्की कंपनीने  काही शेतकऱ्यांच्या व  वनखात्याचा जमिनीतुन रस्ता नेल्याचे समजते. त्यामुळे वनखाते काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या भागातील मुरुम मोठ्या प्रमाणात नेल्याचे दिसुन येत आहे. तो कुठे वापरला याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

 या पवनचक्क्या उभ्या करताना ग्रामपंचायतीचे नाहरकत घेतले जात आहे. यात ही बरेच अर्थपुर्ण व्यवहार झाल्याचे चर्चा होत आहे. काही  कंपन्यांनी  सर्व व्यवहार करण्यासाठी कांही दलाल नेमले आहेत. या दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी तीस वर्षांच्या भाडेकरारावर घेऊन त्या हडप केल्या जात आहेत.

या वाढत्या पवनचक्यांमुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन हि नापिक व ओसाड होणार आहे. अगोदरच तालुक्यात बहुतांश जमिन कोरडवाहु असल्याने शेतकरी अत्यल्प उत्पन्नामुळे आर्थिक अडचणीत असताना आता नापिकीने व असलेली तुटपुंजे उत्पन्न मिळणारी जमीनही या पवनचक्की कंपनीवाल्यांच्या घशात जात असल्याने गरीब शेतकरी भविष्यात खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. आज जरी जमीनीच्या मोबदल्यात कंपनीकडून मिळणारी रक्कम मोठी वाटत असेल तरी ती रक्कम त्यामानाने नगण्यच आहे.  पवनचक्क्यांमुळे आकाशात मुक्त संचार करणारे, शेतांतील पिकांवरील  किटक खाणारे पक्षीही नामशेष होण्याचा धोका संभवतो. जर पक्षी नामशेष झाले तर उर्वरीत शेतातील पिकांवरील किटक कोण खाणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यामुळे परिणामतः शेतीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटणार असुन निसर्गचक्र पुर्णतः कोलमडणार आहे. भविष्यात याचे दूरगामी गंभीर परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. या पवनचक्क्या उभारतांना त्यांच्या संख्येवर मर्यादा घालणे अत्यंत गरजेचे आहे. मनमानी पध्दतीने काम करणाऱ्या पवनचक्क्यांचे काम बंद करण्याबाबत आदेश काढावेत. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीला भविष्यातील रुक्ष वाळवंट होण्यापासून वाचवावे अशी मागणी ञस्त शेतकरी करीत आहेत.


 
Top