तेर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून तेर येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्र राज्यात 40 स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये धाराशिव तालुक्यातील तेर येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जनरल सेक्रेटरी रविंद्र पवार यांनी जाहीर केले आहे.


 
Top