भूम (प्रतिनिधी)-भाजपाचे धाराशिव लोकसभा संयोजक प्रभारी भगवान बांगर यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपाला भगदाड पडले असल्याची चर्चा चालू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची धाराशिव येथे सार्वजनिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे धाराशिव लोकसभा संयोजक प्रभारी भगवान बांगर यांनी नुकताच प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर तसेच शिवसेना संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, लोकसभा समन्वयक स्वप्निल कुंजीर, सहसंपर्क प्रमूख नंदुराजे निंबाळकर यांच्या कामकाजावर विश्वास ठेवून भगवान बांगर यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, तालुका प्रमूख ॲड. श्रीनिवास जाधवर, विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी जिल्हा जिनत सय्यद, परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील, वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे, माजी शहर प्रमुख दिपक मुळे, समन्वयक ॲड. विनायक नाईकवाडी, युवासेना विधानसभा चिटणीस माऊली शाळू, महिला उपजिल्हा प्रमुख ताई लांडे, महिला तालुका समन्वयक रोहिणी ताई गपाट, प्रतिक रणदिवे यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते. 


 
Top