धाराशिव (प्रतिनिधी)- विश्ववंदनीय युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा 344 वा पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. धाराशिव शहरातील रेणुका ब्लड सेंटर जिजाऊ चौक धाराशिव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. 

सर्वसामान्य रयत प्रजा जनता यासाठी शिवछत्रपती व मावळ्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन स्वराज्य निर्माण केले होते. त्याच आदर्शावर पाऊल ठेवून आजच्या आधुनिक युगात रक्त कृत्रीमरित्या निर्माण करता येत नाही. यासाठी गोरगरीब जनतेसाठी रक्ताची प्रचंड आवश्यकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. या रक्तदान शिबिराला समितीच्या सर्व मावळ्यांनी तसेच धाराशिव शहर व परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून व रक्तदान करून शिवरायांना अभिवादन करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. तसेच मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन डॉक्टर संतोष मुळे, डॉक्टर सुभाष वाघ, डॉक्टर शतानंद दहीटणकर, तसेच समितीचे अध्यक्ष गौरव बागल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष आकाश कोकाटे, सचिव अमोल पवार, शहराध्यक्ष मंगेश निंबाळकर, शहर उपाध्यक्ष आकाश भोसले, शहर सचिव शुभम लोकरे, तालुकाध्यक्ष अमोल सिरसट, उपाध्यक्ष दत्ता जावळे, संजय शिंदे, यांचे सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमात शिव स्तवन प्रतापसिंह काकडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मंगेश निंबाळकर यांनी केले.



 
Top