तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञ तुळजापूर मध्ये चोऱ्या व दरोडे घटना वाढल्याने  शहरवासिय भेदरले आहेत. तरी चोऱ्या, दरोडे घटना रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती उपाययोजना करुन गस्त वाढविण्याची मागणी शहरातील नागरिकांना पोलिस निरक्षक यांना निवेदन देवुन केली आहे.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, आई तुळजाभवानीच्या पुण्य पावण नगरीत सातत्याने चोऱ्या, हाणामारी सदृश्य  घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे  शहरातील जनता पूर्ण भेदरलेली आहे. जनतेला दिलासा व सुरक्षा म्हणून तातडीने उपाययोजना व गस्त वाढावी. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने तुळजापूर परिसरात चोरोची दहरात वाढत आहे. आजपर्यंत एक आरोपी पकडला गेला नाही.

नुकतेच महादेव गाटे तुळजार (खुर्द) यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडला आहे. चोर मोकाट फिरत असून तुळजापूर वासिय प्रचंड दहशतीमध्ये जगत आहेत.

तरी पोलिस निरीक्षक यांनी स्वःता लक्ष घालून दखल घेवून गस्त वाढवावी व आरोपीच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत जेने करून शहरातील नागरिक सुरक्षीत राहतील. या निवेदनावर राम दशरथ चोपदार, पंकज शहाणे,सुरज वीर, विकास जाधव, वैभव पांडगळे, फुलचंद सिरसट, ञरुषीकेश पायाळे, माणिक शेख, बबलु पठाण, माजीद शेख तसेच समस्त तुळजापूर शहर वासियांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top