धाराशिव (प्रतिनिधी) - आमदार राजेंद्र राऊत यांच्यावतीने आयोजित महिला मेळावा व हळदीकुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना पाटील या शनिवारी बार्शी येथे आल्या होत्या. यानिमित्ताने त्यांनी बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.

बार्शीत राष्ट्रवादी गट अजित पवारांचे कुठलेही नेतृत्व फारसे दिसत नाही. येथे राजेंद्र राऊत आमदार आहेत. त्यांचाच एक गट येथे आहे. तुम्ही तुमचे राष्ट्रवादीचे वर्चस्व येथे वाढवणार का? असा प्रश्न अर्चना पाटील यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला. यावर त्या म्हणाल्या, मी कशाला वाढवू? मला काही कळतच नाहीय. मी महायुतीची उमेदवार आहे. मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी माझी महायुतीची उमेदवारी आहे. राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझा नवरा स्वतः बीजेपीचा आमदार आहे. मी भगवतांच्या दर्शनाला आलेले आहे. आता हळदीकुंकू कार्यक्रम आहे. मी निवडून येणार आहे आणि मला आमदार राजेंद्र राऊत यांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट, पक्ष हा महायुती वाढणार आहे. म्हणजे मी खासदार झाल्यानंतर आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत. महायुती मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस, अजित काका आणि एकनाथ शिंदे साहेबांना हे करणार आहे. त्यामुळे येथे गट वाढवायचा विषय नाही. 


मी जे बोलले त्याला तोडफोड केले

हे वक्तव्य महायुतीच्या विरोधातील असल्याचे दिसताच नंतर त्यांनी सारवासारव केली. त्या म्हणाल्या, महायुतीचे तिन्ही पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाची मी उमेदवार आहे. या तिन्ही पक्षाचे एक लक्ष्य आहे की, मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे. त्यामुळे माझ्या उमेदवारीने, माझ्या खासदार होण्याने त्या तिन्ही पक्षांचे वर्चस्व वाढणार आहे. मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मिडिया व अन्य माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आले आहे. आमदार राजेंद्र राऊत यांच्यासारखे भावासारखे खंबीर नेतृत्व बार्शीमध्ये जेव्हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी आहे, तेव्हा तिथे ते मला निवडून देतील हेच मी तेथे बोलले होते.


 
Top