तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी भवानी मंदिरातील छञपती शिवाजी महाराज दरवाजाजवळ पाणपोई आहे. माञ येथे पाण्याचे ग्लास उपलब्ध नसल्याने तोटीला हाताची ओंजळ करुन भाविकांना पाणी पिवुन आपली तृष्णा भागवावी लागत आहे. यात ठिकाणी ग्लासेस नसल्याने पाणी वाया ही जात आहे.

भाविकांची तृष्णा भागविण्यासाठी मंदीरात विविध ठिकाणी पाणपोयी आहेत. छञपती शिवाजी महाराज दरवाजा लगत पाणपोयी असुन येथे ग्लास नसल्याने तहानलेले भाविक विशेषता मुले, महिलांना पाणपोई उंचीवर असल्याने कसरत करावी लागत आहे. तसेच दर्शन मंडप दरवाज्या जवळ असणाऱ्या  थंडगार पाणपोई ठिकाणी तीन पाण्याचे नळ आहेत. तर येथे अवघ्या एक ग्लास आहे. तर त्यामुळे उर्वरीत नळाचे पाणी पिण्यास घेण्यासाठी जवळच पडलेल्या प्लास्टिक रिकाम्या बाटलांचा वापर करीत आहेत.


 
Top