धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन करत डीजे वाजविल्या प्रकरणी शहरातील आणखी 13 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पूर्वी आणि आता मिळून 27 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यात आंबेडकर नगर येथील विकास अशोक सोनवणे, बौध्दनगर येथील पृथ्वीराज शिवाजी चव्हाण, उमेश प्रकाश माने, रोहन दिपक सुर्वे, उदयराज संजय बनसोडे, पद्माकर अण्णा धावारे, रणजित श्रीरंग गायकवाड, वैरागनाका येथील संदीप प्रेमचंद बनसोडे, तुळजापूर नाका येथील आनंद जीवन पेठे, भीमनगर येथील राजेश सुर्यकांत माळाळे, गौतमनगर येथील विकास जालिदंर विधाते व सांजा येथील दुर्गाप्रसाद भुजंग सुर्यवंशी यांच्या समोवश आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये लावलेले वाद्य हे पारंपारिक पध्दतीने किंवा पोलिसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे न लावता डीजे लावून आदेशाचे उल्लंघन केले. लोकसेवक, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी दिलेले सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीसच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केली. यावरून पोलिसांनी वरील व्यक्तीविरूध्द कलम 188 अन्वये धाराशिव शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत. 


 
Top