कळंब (प्रतिनिधी)- येथील आराध्य दैवत म्हणुन राज्यसह बाहेरराज्यातही प्रसिद्ध असणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान होत आहे. मुख्य चुना वेचण्याचा व पालखीचे आमराई मंदिरात आगमन मंगळवारी (दि. 24) रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी दर वर्षी दहा ते बारा लाखाच्या वर भाविक दाखल होतात. त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये. कायदा सुवस्था व भाविकांच्या सूरर्क्षेसाठी पोलिस प्रशासनाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी चार वाजता यात्रासाठी केलेल्या तयारीची पाहणी केली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी झाली आहे. स्थानिक प्रशासन, ग्राम पंचायत, देवस्थान ट्रस्टने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे. देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा मोहोत्सवाची कार्यक्रम पत्रिका प्रकाशित केली आहे.

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला व देवीच्या पालखी सोहळ्यात देवीच्या पालखीवर येथील पारंपरिक चुन्याच्या रानात चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्याची प्रथा जुनीच असल्याने या कार्यक्रमासाठी राज्यभरासह बाहेर राज्यातून लाखोंच्या वर येतात. यामुळे या यात्रेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागावर ताण असतो.

चुना वेचण्याचा व देवीच्या पालखीचे आमराई मंदिरात आगमन कार्यक्रम बुधवार (दि. 24) रोजी होणार आहे. यंदाची येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान होत असुन दि. 22 एप्रिल रोजी डोंगरावरील मुख्यमंदिरात रात्री 8 :30 वा देवीची पंचोपाचर महापूजा देवीचा छबीना होणार आहे. ता.24 रोजी देवीच्या पालखीचे मुख्यमंदिरातून आमराई मंदिराकडे स.8 वा. वाजत गाजत आमराई मंदिराकडे प्रस्थान होईल.आमराई मंदिराकडे जाताना पालखीचे चुन्याच्या रानात स.11 वा आगमन होईल याच वेळी चुना वेचण्याचा कार्यक्रम होऊन देवीच्या पालखीचे आमराई मंदिरात 12 वाजता येईल. चैत्र पौर्णिमे यात्रेत पाच दिवस आमराई मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी राहते. त्यानंतर आराध्याचा मेळावा व दि. 27 रोजी शोभेच्या दारूची आतिषबाजी व दि. 28 रोजी आमराई येथून निघून मंदिर परिसरात जाणार आहे.


 
Top