धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात फक्त घोषणाबाजी करत जनतेला झुलवत ठेवले. महागाई कमी करण्याची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेची लूट केली. शेतीमालाचे भाव पाडून खते बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूचे भाव वाढवले. महाविकास आघाडी सरकार जनतेच्या आणि विशेषतः बारा बलुतेदार घटकाला न्याय देऊ शकते असे प्रतिपादन बारा बलुतेदार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केले.  

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई (ए) आणि मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथील काँग्रेस भवन येथे बारा बलुतेदार संघटनेची बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, 25 एप्रिल रोजी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार कैलास पाटील यांचेही भाषण झाले. बैठकीस शिवसेना उपनेते लक्ष्मण वडीले, बारा बलुतेदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, सतिश कसबे, धनंजय राऊत, रवि कोरे आळणीकर, नितिन शेरखाने, सोमनाथ गुरव, सिध्दार्थ बनसोडे, ॲड. परवेज काझी, इलियास मुजावर, ॲड. गणपती कांबळे, अभिजित गिरी, अक्षय माने, सतीश लोंढे, कृष्णा भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी धनंजय राऊत व सिध्दार्थ बनसोडे यांनी परीक्षम घेतले.


 
Top