कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीच्या नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले पाऊल प्रवेशत्सव अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपी, फळांचा राजा केशर आंबा, गुलाब पुष्प,फुगे, शैक्षणिक साहित्य, केळी देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात माता पालकांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व फित कापून करण्यात आले.विविध टेबलावर शैक्षणिक साहित्य ठेवून विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रस्तावित उपक्रमशिल शिक्षक धनंजय गव्हाणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरोजिनी पोते व सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.


 
Top