धाराशिव (प्रतिनिधी) - 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज 16 एप्रिल 2024 रोजी तीन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनोहर आनंद पाटील यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशितपत्र दाखल केले. आज 8 व्यक्तींनी 23 अर्ज खरेदी केले. तीन दिवसात 49 व्यक्तींनी 118 अर्जाची खरेदी केली.


 
Top