धाराशिव (प्रतिनिधी)-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, 13 एप्रिल रोजी भीमजी ऑटोरिक्षा युनियन यांच्यावतीने शहरातून ऑटोरिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात रिक्षा सहभागी झाले होते.

मध्यवर्ती बसस्थानकातून या रॅलीचा शुभारंभ अण्णासाहेब गायकवाड, मोन्याभाई बोकेफोडे, गोपीशेट बनसोडे, अरुण रणखांब, गौतम सोनवणे आदीसह पदाधिकारी व भीमसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या रॅलीत निळ्या ध्वजांनी रिक्षांची सजावट करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरुषांचा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ही रॅली बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ताजमहल टॉकीज चौक, देशपांडे स्टॅन्ड, आझाद चौक, माऊली चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, त्रिसरण चौक, लेडीज क्लब मार्गे राजमाता जिजाऊ चौक, माणिक चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मार्गे पोलिस मुख्यालय, समता नगर, महात्मा ज्योतिबा फुले चौकात आल्यानंतर फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक विजय गवळी, संतोष कांबळे, सुरेश सररवदे, अध्यक्ष सागर सिरसाठे, उपाध्यक्ष बाळू रणखांब, कोषाध्यक्ष नंदू सोनवणे, सहसचिव धर्मा दुपारगुडे, सदस्य सचिन गंगावणे, अमोल वाघमारे, आकाश गायकवाड, विकास वाघमारे, बंटी सरोदे यांनी परिश्रम घेतले.


 
Top