तुळजापूर (प्रतिनिधी)-लोकशाहीच्या  उत्सवात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलां मतदारांचा महागाई कमी  करणारा, महिला, मुली सुरक्षा यांना प्राधान्य देवुन आरोग्य सुरक्षा, रोजगार उपलब्ध करुन  देणारे सरकार व  खासदार आम्ही निवडून देणार आहोत. अशी प्रतिक्रिया  स्ञी शक्ती देवता श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या धाराशिव लोकसभा मतदार संघातील महिला मतदारांमधुन व्यक्त केल्या जात आहेत.

धाराशिवच्या लोकसभेच्या इतिहासात 1991 साली विमल मुंदडा यांना 2004 साली माजी खासदार कल्पना नरहिरे यांना तर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. कल्पना नरहिरे यांचा 1,649 मतांनी विजय झाला होता. तर मुंदडा ह्या 83,055 मतांनी पराभूत झाल्या. अर्चना राणाजगजीतसिंह पाटील या आता लोकसभेसाठी नशीब अजमावत आहेत.

धाराशिव लोकसभेत 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असुन त्यात 9 लाख 46 हजार 54 मतदार ह्या महिला असुन 10 लाख 58 हजार पुरुष मतदार

आहेत. या निवडणुक फक्त आणि फक्त महिला मतदार फँक्टर  निर्णायक ठरू शकणार आहे. महागाई, आरोग्य, सुरक्षा, रोजगार  या प्रश्नांना या मतदार संघातील महिला मतदान करण्यासाठी  प्राधान्य देत असल्याचे दिसुन येते. पुर्वी महिला मतदान करण्या बाबतीत घरकत्यावर अवलंबून असत तो काळ आता राहिला चुल मुल सोडुन महिला आता बाहेर पडली आहे. तिच्यात महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हा मतदार कुठल्याही अमिषाला बळी पडणार नसतो याचे मत घेण्यासाठी कामच करावे लागते. 
Top