तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील  काक्रंबा येथे महात्मा फुले यांच्या 197 जयंतीनिमित्त  महात्मा फुले युवा मंचा तर्फ आयोजित रक्तदान शिबीरात 130 रक्तदात्यांनी रक्तदान करुन अभिवादन केले .

येथील मारुती मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 130 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. येथील महात्मा फुले युवा मंच व हरिहर गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. जयंती निमित्त गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही येथील मारुती मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 130 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.एकंदरीत शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही रक्तदानाचे महत्त्व पटल्याने तरुणासह ज्येष्ठांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेत प्रथमच काक्रंबा येथे130  रक्तदात्यांची नोंद झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  महात्मा फुले युवा मंचचे पदाधिकारी  सदस्यांनी परिश्रम घेतले.


 
Top