भूम (प्रतिनिधी)-येथील सुनील उद्धवराव माळवदे यांची मुलगी डॉ. कुमारी साक्षी सुनील माळवदे हिने बीएचएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण धोंडू मामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे मधून पूर्ण केले आहे. सदर शिक्षण क्रमाचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. याबद्दल साक्षी माळवदे व कुमारी हिरणमई सचिन होळकर यांची सैनिकी स्कूल सातारा या ठिकाणी सैनिकी शाळेसाठी निवड झाल्याबद्दल यां या दोघींचा सत्कार कुलवंत वाणी समाज ट्रस्ट व कुलवंत समाज भूमच्या वतीने करण्यात आला. यावेळी सुनील माळवदे, सरोजिनी माळावदे, अनिल तोडकर, सूर्यकांत शेटे, विकास माळवदे, धनंजय शेटे, संजय होळकर, किरण दंड नाईक, राम होळकर, अमित होळकर, आदी समाज बांधव उपस्थित होते.


 
Top