धाराशिव (प्रतिनिधी)- सांजा गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत आज दि. 18 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे जिल्हा परिषद शाळेमार्फत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

हा मतदार जनजागृती कार्यक्रम मुख्याध्यापक पडवळ, केंद्रप्रमुख गिरी, मोरे यांच्या मार्गदर्शनात गावातील चौका-चौकात एकांकीका नाटीका व समुहगीत गायनाद्वारे सादर करून मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके, गटशिक्षणाधिकारी  असरार सय्यद, तहसिलदार यांचे प्रतिनिधी म्हणून महेबुब काझी, कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी चंदनशिवे, स्वीप सहाय्यक केंद्रप्रमुख नागटिळक सर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीमती साळुंके यांनी देवदर्शनासाठी आलेल्या वधू वरांना बोहल्यावर चढण्याअगोदर मतदान करण्याबाबत शपथ दिली. तसेच उपस्थित असलेल्या वयोवद्ध आजी यांना देखील मतदानाचे महत्व विषद केले.


 
Top