धाराशिव (प्रतिनिधी)-भूम येथील बाजारात जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटर सायकल चोरणाऱ्या आरोपीला तीन मोटर सायकलस अटक केली आहे.

जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलिस पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग होते. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लक्ष्मी नगर ता. भुम येथील  युवराज सुखदेव ओव्हळ यांच्याकडे एक चोरीची हिरो होंन्डा मोटरसायकल आहे. तो सध्या आठवडी बाजार भुम येथे आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लागलीच आठवडी बाजार येथे जावून आरोपीचा शोध घेत असताना एका इसम पथकास पाहून पळून जत असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव युवराज सुखदेव ओव्हाळ, वय 35 वर्षे, रा.लक्ष्मी नगर भुम ता. भुम जि. धाराशिव असे सागिंतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मी गेल्या काही दिवसात भुम, वाशी येथुन मोटरसायकल चोरी केल्या आहे. अशी कबुली दिल्यावरुन नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 3 मोटरसायकल एकुण 1 लाख 5 हजार रूपये किंमतीच्या माल जप्त केला. 

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर,  पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, चालक अरब, चालक किंवडे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top