धाराशिव (प्रतिनिधी)-विविध गुन्ह्यातील आरोपी माहिती घेवून गस्त घालत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला धाराशिव शहरातील साळुंके नगर येथे एका कारमध्ये दरोड्याची तयारी करत असलेले 3 आरोपींना पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग करत होते. दि. 16.04.2024  रात्री साळुंके नगर पाटीजवळ धाराशिव येथे आले असता पाटीजवळ अंधारामध्ये रोडच्या बाजूस एक राखाडी रंगाची मारुती इको व्हॅन संशईतरीत्या आंधाराचा दबा धरुन बसलेले दिसून आले. पथकाने गाडीजवळ जावून पाहीले असता गाडीतील तीन इसम हे तोडांला मास्क व रुमाल बांधलेले असल्याचे दिसून आले. पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शंकर भैरु चव्हाण वय 30 वर्षे,  सुरेश भैरु चव्हाण वय 42 वर्षे दोघे रा. मोघा बी. ता. आळंद जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक, कालीदास राम काळे, वय 57 वर्षे, रा. मालवानी  मलाड अंबोजोवाडी आझादनगर मुंबई हा.मु. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव असे सागिंतले. पथकाने त्यांचे ताब्यातून एक राखाडी रंगाची मारुती इको या कंपनीची कार क्र. एमएच 47 एएन 9619, एक लोखंडी कुह्राड, लाकडी दांडे, एक लोखंडी पक्कड, स्क्रु ड्रायव्हर, एक हेक्सॉ ब्लेड, तोंडाला बांधण्या करीता वापरलेले मास्क, व हातरुमाल असा एकुण 5 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद तीन आरोपीस मालासह धाराशिव शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर,  पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, चालक किंवडे  यांच्या पथकाने केली आहे.



 
Top