भूम (प्रतिनिधी)-आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत धाराशिव जिल्ह्याला मिळालेल्या दोन लॅब पैकी भूम तालुक्यातील एकमेव अशी सुसज्ज ऍस्ट्रॉनॉमी (भौगोलिक) लॅब रविंद्र हायस्कूलला मिळाली.या ऍस्ट्रॉनॉमी लॅबचे उद्घाटन आयसीआयसीआय फाउंडेशनचे जिल्हा विकास अधिकारी ढेकळे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आयसीआयसीआय तालुका समन्वय मकरंडे, तालुका कृषी सहाय्यक गणेश शेंडगे, साई कॉम्प्युटर अकॅडमी संचालक युसुफ शेख हे उपस्थित होते. तसेच या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, धनंजय पवार, भागवत लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top