धाराशिव  (प्रतिनिधी) - 18 व्या लोकसभेसाठी 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6  या वेळेत मतदान होणार आहे.19 एप्रिल 2024 रोजी अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदार संख्येनुसार या निवडणुकीत 19 लक्ष 92 हजार 737 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये 10 लक्ष 52 हजार 96 स्त्री, 9 लक्ष 40 हजार 560 पुरुष आणि 81 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद व परांडा या विधानसभा मतदारसंघासोबतच शेजारच्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघात 315 मतदान केंद्र आहे. या मतदारसंघात 1 लक्ष 64 हजार 500 स्त्री,1 लक्ष 46 हजार 193 पुरुष आणि दहा तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 10 हजार 703 मतदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 98 हजार 517 स्त्री,1 लक्ष 77 हजार 39 पुरुष व 6 तृतीयपंथी अशी एकूण 3 लक्ष 75 हजार 562 मतदार 406 मतदान केंद्रात मतदान करतील.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 410 मतदान केंद्र असून 1 लक्ष 92 हजार 957 स्त्री, 1 लक्ष 72 हजार 977 पुरुष आणि 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 65 हजार 951 मतदार,परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 73 हजार 146 स्त्री, 1 लक्ष 52 हजार 13 पुरुष व 6 तृतीयपंथी अशी एकूण 3 लक्ष 25 हजार 165 मतदार हे 372 मतदान केंद्रावर मतदान करतील.

औसा विधानसभा मतदारसंघात 307 मतदान केंद्रावर 1 लक्ष 56 हजार 479 स्त्री,1 लक्ष 37 हजार 604 पुरुष व 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 94 हजार 86 मतदार तर बार्शी विधानसभा मतदारसंघात 329 मतदान केंद्र असून 1 लक्ष 66 हजार 497 स्त्री,1 लक्ष 54 हजार 734 पुरुष तर 39 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 21 हजार 270 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.


 
Top