धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची निस्वार्थ कार्य पध्दती, तसेच लालासाहेब मगर, बशीर तांबोळी, बाळासाहेब वाघमारे, अविनाश मोकाशे, सविताताई पांढरे यांचे अभ्यासू, कनखर व निर्भीड नेतृत्व यावर विश्वास ठेवून नगर परिषद धाराशिव येथील शिक्षक श्री. राजेंद्र पवार, तसेच प्रा. शा. उत्तमी ता. धाराशिव येथील शिक्षक श्री. महेबूब काझी यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला.
एकिकडे जिल्ह्यातील काही संघटना या प्रशासनाच्या दलाल म्हणून काम करत असून अशा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य शिक्षकांचे आर्थिक शोषण करून दलाली खात आहेत तर दुसरीकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी हे शिक्षकांची कामे विनामूल्य करून दलाली मुक्त प्रशासना साठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
अशा निस्वार्थ कार्यपध्दीने प्रभावीत होऊन आम्ही या संघटनेत जाहीर प्रवेश करत आहोत, असे मत राजेंद्र पवार व महेबूब काझी यांनी प्रवेशा वेळी व्यक्त केले. यावेळी लालासाहेब मगर व बशीरभाई तांबोळी यांच्या हस्ते पवार सर व काझी सर यांचा यथोचित सत्कार करूण नगर परिषद, जिल्हा प्रमुख म्हणून राजेंद्र पवार यांची तर जिल्हा कार्यालयीन चिटणीस म्हणून महेबूब काझी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे पत्र दोघानाही देऊन पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राजर्शी शाहू महाराज शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव, राजाभाऊ अकोसकर, शिवाजी साखरे, सोमनाथ केवटे आदींची उपस्थिती होती.