तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जवाहर विद्यालय अणदूर येथे शिकणारी मौजे धनगरवाडीची कन्या संस्कृती घोडके ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्तीस पात्र ठरली  आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस परिक्षेत संस्कृती खंडू घोडके हिने 178 पैकी गुण घेऊन धाराशिव जिल्ह्य़ातून मुलीतून प्रथम व सर्वसामान्य गटातून द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे.

या परीक्षेसाठी विद्यालयातील शिक्षक व सुयश कोचिंग क्लासेस लंगडे तसेच पाटील यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, शाळेतील सर्व शिक्षक धनगरवाडीचे सरपंच नागनाथ घोडके,उमेद प्रभाग समन्वयक अजित घोडके,ग्रामपंचायत सदस्य सुरेखा खंडू घोडके,जि.प.प्रा धनगरवाडीचे मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे, लंगडे  व पाटील तसेच सर्व धनगरवाडी ग्रामस्थ यांनी कौतुक केले.


 
Top