धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यांच्या आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  गौहर हसन  यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, पोहेकॉ निंबाळकर, पोहेकॉ वाघमारे, पोहेकॉ सय्यद, पोना 1611 जाधवर, पोन 1479 जाधवर, पोकॉ अरसेवाड, यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात असताना दि. 06.04.2024 रोजी पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, काही इसम आपसिंगा ता. तुळजापूर येथे काही इसम चोरीच्या साहित्य घेवून विक्रीसाठी थांबले आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरील पथक बातमीच्या ठिकाणी  रवाना होवून बातमी मधील विधीसंघर्ष तीन बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही तिघांनी  मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावर विशेष पथकाने त्यांच्या ताब्यात असलेले  210 किलो दोन पोते सोयाबीन, बळीराम नांगर, 130 किलो ज्वारी असा एकुण 19 हजा 850 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याची खात्री करता ती पोलीस ठाणे तुळजापूर गुरंन 155/2024, 156/2024, 157/2024, 158/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद विधीसंघर्ष तीन बालकास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर,  पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, यांच्या पथकाने केली आहे.


 
Top