धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डी. डी. म्हस्के, बार्शी उपस्थित होते. 

प्रा. डी. डी. म्हस्के, बार्शी यांनी प्रमुख अतिथी म्हणुन “ फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा“ या विषयावर सखोल व विस्तृत  मार्गदर्शन केले.  त्यांनी  महापुरुषांच्या विचारातील  समान धागा स्पष्ट केला. 1883 ला प्रकाशित  “शेतकऱ्यांचा असुड“ या  ग्रंथात शेतकरी हितासाठी शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. “विद्येविन मती गेली, मतिविना  निती  गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र  खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.“  महात्मा गौतम बुद्ध यांनी शिक्षणाची व्याख्या केली, “सत्याला सत्य, व असत्याला असत्य म्हणणे म्हणजे शिक्षण.“ महात्मा फुले यांनी शिक्षणाची व्याख्या केली, “खरे खोटे ओळखणे म्हणजे शिक्षण.“ शाहू महाराजांनी 24 जुलै 1917 रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे, असा कायदा केला. 1882 मध्ये हंटर कमिशनसमोर, महात्मा फुुलेंनी साक्ष दिली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे, असे म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यशाचा  मंत्र दिला, “ शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा.“ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो पिणार, तो गुरगुरल्या राहणार नाही. त्यांनी राज्यघटनेेत शिक्षण विषयक  महत्वपूर्ण तरतूद केली. 14 वर्षाखालील मुलांना शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे, असे म्हटले.  महिलांना शिक्षणसाठी प्रोत्साहन दिले. कार्लेली सोराबजी हि देशातील पहिली मुलगी आहे जिने  दहावी परिक्षा उत्तीर्ण केली. तीच पहिली  पदवीधर झालेली मुलगी आहे.  आरक्षणाचे  तत्व हे सामाजिक न्यायाचे आहे. सामाजिक, आर्थिक समतेशिवाय लोकशाही मजबूत होणे शक्य नाही. जातीनिहाय जनगणनेनुसार जातीच्या प्रमाणात नोकऱ्या देण्यात याव्यात. संख्या प्रमाणात प्रत्येक जातीतील लोकांना कामे द्यावीत, असे महात्मा फुले यांनी सामाजिक न्यायाची भुमिका मांडली.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  राज्यघटनेत 340 व्या कलमानुसार ओबीसीसाठी आरक्षण दिले. 341 कलमानुसार एससी, व 342 कलमानुसार एसटीसाठी आरक्षणसाठी  तरतूद केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे राखीव जागांची मागणी केली होती.  प्रौढ मताधिकार मिळाला पाहिजे, हि भुमिका त्यांनी मांडली होती.  स्टार्ट कमिशन प्रमाणे  इतर मागासवर्ग  ओबीसी हे नामकरण डॉ.  बाबासाहेबांनी  आंबेडकर यांनी केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1942 मध्ये मजुरमंत्री झाले. 1970 पासून रेल्वेमध्ये आरक्षण अंमलबजावणी सुरु केली. 1927 हे महात्मा फुले यांंचे जन्मशताब्दी वर्ष होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह 11 एप्रिल 1927 रोजी केला. महात्मा  फुुलेंनी शेतकऱ्यांचे दु:ख देशात पहिल्यांदाच पुस्तक रुपाने मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4 फेब्रुवारी 1924 ला आमदार झाले. विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. उत्पादनांवर आधारित शेतसारा असला पाहिजे, असे मत मांडले.  17 सप्टेंबर 1927 ला खोती बद्दल विधेयक मांडले. शेतकऱ्यांंचा  पहिला संप घडवून आणला. संंप सात वर्ष चालला.  खोती पद्धत नष्ट करा, सावकारी बंद  करा  आदि   घोषणा संपात  देण्यात आल्या होत्या. त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केेेले की शेतकऱ्यांनी  संघटित होऊन सत्ता हाती घ्यावी. आपले हितकर्ते व शोषणकर्ते कोण आहेत, हे ओळखले पाहिजे. भांडवलदार व शेतकरी यांची मैत्री होऊ शकत नाही.  शेतकऱ्यांनी भेकडपणा सोडला पाहीजे. अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे.  मला शेतकऱी सत्ताधारी  झालेला पाहायचा आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. शेतकरी सत्तेत सहभागी झाल्यास शेतकरी हिताचे निर्णय होतील, अशी त्यांची भुमिका होती.  हिराकुड, दामोदर धरणाचा पाया त्यानी  रचला.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक,  प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान  कार्य  प्रेरणादायक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  कृषी, महिला, आरक्षण  व सर्वच समाज घटकांसाठी अलौकिक कार्य केले आहे.  त्यांनी सुरुवातीस वकिली व नंतर प्राध्यापकी हा व्यवसाय केला. देेशाच्या राजकिय, सामाजिक व आर्थिक विकासासाठी महान कार्य केले. डॉ. बाबासाहेब  आंबेडकर महान  समाजसुधारक होते. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे  त्यांनी अथक प्रयत्न केले. सत्याग्रह करून सर्वांसाठी चवदार तळे खुले केले. समाजसुधारणा झाल्याशिवाय स्वातंत्र्य टिकविता येणार नाही, यासाठी समाजसुधारणेे प्राधान्य दिले. समाज प्रबोधन करण्यासाठी पाक्षिक चालविले. कमाल जमीन धारणा कायदा केला. समाजासाठी जीवन अर्पण केले. सकस शिक्षण दिले पाहिजे, असे मत आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.  डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.  कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.


 
Top