तेर (प्रतिनिधी)-संत श्री गोरोबा काकांच्या समाधीचे दर्शन म्हणजे सदैव एक अद्भुत आनंदाची आणि अध्यात्मिक समाधानाची अनुभूती असते.केंद्रात मोदी सरकार व राज्यात महायुती सरकार येऊन धाराशिव लोकसभा क्षेत्र विकासाच्या, प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचावे अशी प्रार्थना श्री संत गोरोबा काकांच्या चरणी आमदार राणाजगजितसिह पाटील व महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी केली.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात आमदार राणाजगजितसिह पाटील व धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी 16 एप्रिलला दर्शन घेतले. यावेळी दोघानीही प्रार्थना केली.यानंतर कोष्टांबिकादेवी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

यावेळी पद्माकर फंड, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, भास्कर माळी, डॉ. गुरुप्रसाद चिवटे, प्रवीण साळुंके, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी,नारायण साळुंके ,गणेश नाईकवाडी, गणेश फंड, विकास भोरे, विलास रसाळ,राहुल गायकवाड, खंडू माने, जुनेद मोमीन,  अर्शाद मुलांनी , शुभम चिवटे, सूर्यकांत नाईकवाडी, दयानंद फंड, लतिका  पेठे, जयदेवी शिराळ, पौर्णिमा झाडे,मिरा जाधव  व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top