धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्याला आपण स्वतः लक्ष देवून येथील राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी ताकद देवू असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. 

धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार रोहित पवार हे आले होते. सभेनंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सत्कार केला.

यावेळी आमदार रोहित पवार यांना जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी विविध विषयावर चर्चा करुन जिल्ह्यातील कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, अशोक जगदाळे, भालचंद्र बिराजदार, मुस्ताक हुसैनी, बाळासाहेब कथले, ॲड. प्रविण शिंदे, ॲड. तात्या तावरे, बालाजी डोंगे, श्रीहरी नाईकवाडी, नशीरशहा बर्फीवाले, सतीश सोन्ने, भाउसाहेब खरसडे, खंडू जाधव, शिवाजी सावंत, सतीश माळी, सिकंदर बेगडे, विठ्ठल माने, अमोल पाटील, राहुल बनसोडे, रणजित वरपे, इकबाल पटेल, मनोहर हारकर, रणवीर इंगळे, शामसुंदर पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुसेद्दीक काझी यांनी केले. 
Top