सोलापूर (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर की 133 वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन विभागीय रेल्वे व्यस्थापक कार्यालय, सोलापूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री निरज कुमार दोहरे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्र सिंह परिहार आणि प्रमुख अतिथी डॉ. दिलिपकुमार नवले यांच्या ह्स्ते डॉ. बाबासाहेबा आंबेड्करांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. व त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात आली. 

यावेळी  डॉ. दिलिपकुमार नवले, वैज्ञानिक अधिकारी, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, कलबुर्गी यांनी डॉ. बाबासाहेबांच्या राष्ट्रव्यापी योगदानाबद्दल तसेच त्यांच्या आयुश्यातील महत्वाच्या घटनांवर आपले मार्गदर्शन केले. विभागीय रेल्वे व्यस्थापक, श्री निरज कुमार दोहरे यांनी डॉ बाबासाहेबांच्या विचाराचे कार्याचे उद्दिष्ट व समाज हितासाठी केलेल्या कठोर परिश्रमाच्या उल्लेख केला. या कार्यक्रमास सर्व शाखा अधिकारी, अन्य अधिकारी, मान्यता प्राप्त युनियन व असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. हिंदी विभागाचे वरिष्ठ अनुवाद श्री मुश्ताक शेख यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत उपस्थीतांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक कार्मिक अधिकारी श्री. सुधिर खोत, श्री. शेख मस्तान व श्री. पद्माराव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कल्याण निरीक्षक श्री. महावीर निमाणी, अरविंद खडाखडे, सतिश सोणवणे, अक्षय गर्दने व सचिन बनसोडे यांनी विषेश परीश्रम घेतले.  


 
Top