कळंब (प्रतिनिधी)-शहरातील प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँकेला 31 मार्च 2024 अखेर  नफा हा 1 कोटी 88 लाख रुपयाचा झालेला आहे. बँकेचे  भागभांडवल मार्च 2023 अखेर 3 कोटी 60 लाख 19 हजार होते त्या तुलनेत मोठी  वाढ होऊन ती  31 मार्च 2024 वर  4 कोटी 6 लाख 9 हजार झाले आहे. मागिल वर्षाच्या तुलनेत ती 12.75 % वाढ झाली आहे. 31 मार्च 2023  या  वर्षाच्या  ठेवीच्या तुलनेत 15.30% वाढ होऊन 31 मार्च 2024  मध्ये त्या  92 कोटी 53 लाख 91 हजार झाल्या आहेत. बँकेचे एकूण कर्ज वाटप 31 मार्च 2024 अखेर 55 कोटी 75 लाख 24 हजार एवढे आहे. बँकेला एन.पी.ए प्रमाण 0 % ठेवण्यात यश आले आहे. बँकेची मोबाईल बँकिग सेवा, गुगल पे, फोन पे, हि सेवा ग्राहकाच्या सेवेत चालु झाली आहे. बँकेची लॉकर आणि ए.टी.एम. हि सेवा कार्यरत आहे. लवकरच बँक 100 कोटी  ठेविचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे. बँकेला भारतीय रिज़र्व बँकेने नविन दोन धाराशिव व बार्शी या शाखाना मंजुरी दिली आहे. लवकरच ग्राह्कांच्या सेवेत या शाखा कार्यरत होत आहेत. आज बँकेचे कार्यक्षेत्र 5 जिल्ह्यामध्ये विस्तारलेले आहे.गतवर्षीचा बँकेस उत्कृष्ठ बँक पुरस्कार बँको तर्फे मिळाला आहे.बँकेच्या एकूण मुख्य कार्यालयासह 5 शाखा कार्यरत असून लवकरच नवीन 2 शाखा कार्यान्वित होत आहेत.बँकेने डिजिटल बँकिंग वरती भर देऊन ग्राहकांच्या सेवेत मोबाईल बँकिंग, UPI, IMPS सुविधा चालू केल्या आहेत व लवकरच ग्राहकांच्या सेवेत सुविधा सुरू करण्यात येईल.तसेच येणाऱ्या भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञानाच्या सुविधा ग्राहकांना देण्याचा मानस संस्थापक अध्यक्ष श्रीधर भवर  यांनी व्यक्त केला आहे. बँकेचे सभासद खातेदार ,ठेवीदार,कर्जदार,हितचिंतक यांच्या सहकार्याने बँकेची यशस्वी वाटचाल सुरू  आहे. अशी ही माहिती बँकचे संस्थापक अध्यक्ष /चेअरमन श्रीधर  भवर यांनी दिली आहे.


 
Top