धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जुने बस स्थानक परिसरातील नाभिक, सुतार आणि तांबोळी समाजाच्या दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी सबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, तेर येथील जुने बस स्थानक परिसरात ग्रामपंचायत मालकीच्या जागेत नियमित कर भरणा करुन गेल्या 30 ते 40 वर्षापासून पारंपारिक व्यवसाय नाभिक, सुतार, तांबोळी समाजाचे लोक करत आहे. परंतु गावातील प्रज्ञा अशोक फंड आणि आदित्य अशोक फंड यांनी धाराशिव तहसिलदारांना खोटी माहिती देऊन त्यांच्या मिळकतीवर अतिक्रमण केल्याचा अर्ज दाखल केला आहे. वास्तविक तहसिलदारांनी तक्रादारांना नोटिसा देऊन खरोखरच अतिक्रमण झाल्याबाबत चौकशी करुन तालुका भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी करुन घेऊन निर्णय घेणे आवश्यक असताना कोणतीही चौकशी न करता अर्जदारांना अंधारात ठेवून आदित्य फंड आणि प्रज्ञा फंड यांच्या खोट्या माहितीच्या आधारावर अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला. सदर प्रकरणात धाराशिव येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला असून तो अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी अर्जदारांनी तहसिलदार, सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना देखील प्रतिवादी केलेले आहे. सदर दाव्यात अर्जदाराने दिलेल्या तात्पुरत्या मनाईचा अर्ज नामंजूर केल्याच्या कारणावरुन पुन्हा अपील केलेले असून ते अद्याप प्रलंबित आहे. अर्जदारांनी न्यायालयात दाखल केलेली प्रकरणे प्रलंबित असताना आणि त्यांना कुठलीही नोटीस न देता पोलीस प्रशासपाचा गैरवापर करुन प्रज्ञा अशोक फंड, आदित्य अशोक फंड यांनी बेकायदेशीरपणे दुकानांची तोडफोड केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर प्रकाश झांबरे, साहेबराव कदम, सुनील येडके, सुरेश माने, अमीर तांबोळी, हिरालाल तांबोळी, रुक्मीणी सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, अंकुश राऊत, आशा राऊत, उमाकांत राऊत, रुपाली सुरवसे, उर्मिला आतकरे, तानाजी बनसोडे, बाबुराव राऊत, मोहसीन तांबोळी, खलील काझी, अब्दुल यासीन मुंढे , स्वाती पांचाळ, स्वप्नील पांचाळ, इरफान पिंजारी, धनराज भातभागे, सुभाष सूर्यवंशी, नानासाहेब राऊत, सूर्यकांत सुतार, लक्ष्मण सुतार, विष्णू येडके, जगन्नाथ जगदाळे, अब्दुल याकुब , यासीन मलंग व इतर नागरिकांची स्वाक्षरी आहे.


 
Top