धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच जिल्हयातील  नेतृत्व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश  बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र  धुरगुडे  यांच्या  हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे जिल्हा उपाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली.

कार्ला ता.तुळजापूर येथील शिवाजी हरिदास कोकरे यांची धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी  प्रदेश उपाध्यक्ष सुरेश  बिराजदार आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती देण्यात आली. नव नियुक्त जिल्हा उपाध्यक्ष यांचा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हाध्यक्ष्‌‍ महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्यासोबत प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर  साठे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, महीला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,सा.न्याय. जिल्हा सरचिणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव शहर महीला शहराध्यक्षा सुलोचना जाधव,अंबेजवळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड, खंडेराव किशवे, दत्तू देवकर, बालाजी देवकर संतोष जाधव, अमोल देवकर, रामा देवकर, तुकाराम देवकर, नागनाथ शेंडगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top