धाराशिव (प्रतिनिधी)-21 मार्च हा कविता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाच्या निमित्ताने कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी कलाविष्कार तर्फे कवी संमेलनाचे आयोजन केले होते. सुप्रसिद्ध कवी डॉक्टर रुपेश कुमार जावळे यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनामध्ये जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे, डॉक्टर अरविंद हंगरगेकर, बाळ पाटील, विजय गायकवाड, अभिमन्यू इंगळे, डॉक्टर शिवाजी गायकवाड, कृष्णा साळुंखे, अविनाश मुंडे, स्नेहलता झरकर, अंदुरे, डॉक्टर अस्मिता बुरगुटे, डॉक्टर कृष्णा तेरकर, पंडित कांबळे, श्याम नवले, डॉक्टर मधुकर गुजरे, प्रभाकर बनसोडे इत्यादी कवींनी उत्स्फूर्त पणे सुंदर कविता सादर केल्या व कविता दिवस साजरा केला. सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले.


 
Top