धाराशिव (प्रतिनिधी)-  29 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. नागरीकांनी पहिल्याच दिवशी विविध कलाप्रकार आणि नाटकाचा आस्वाद घेतला. आजही कलाप्रेमींना सांस्कृतिक कार्यविभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे लाभ घेण्याचा मोह आवरला नाही आणि आज दुपारी चार वाजता सागर चव्हाण व त्यांच्या संघाने संबल या कलाप्रकाराचे सादरीकरण केले. लुप्त होत असलेल्या कला प्रकारांना आपल्या डोळ्यांसमोर जिवंत स्वरूपात बघण्याचं मोह धाराशिवच्या नागरिकांना टाळता आलं नाही दुपारी भर उन्हात चार वाजता सादर झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात गर्दी केली व कलावंतांच्या कलागुणांना दाद दिली.

यानंतर प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे “साध काळजाची काळजाला“ या कवी संमेलनाची. कलाविष्कार अकादमी तर्फे होणाऱ्या कवी संमेलनचे अध्यक्ष राजेंद्र अत्रे व इतर निमंत्रित कवी यांच्या कविता आणि काव्यप्रकार सादर करण्यात आले. एकापेक्षा एक कवी यांचे कलाम ऐकण्याचे सौभाग्य धाराशिवरांना प्राप्त झाले. या कविसंमेलनात अध्यक्ष राजेंद्र अत्रे, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर, हणमंत पडवळ, डी. के. शेख, शाम नवले, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. शिवाजी गायकवाड, पंडित कांबळे, मनीषा क्षीरसागर, कृष्णा साळुंके, गणेश मगर, सुवर्णा शिनगारे, मनिषा पोतदार, अश्विनी धाट, स्वप्नाली झाडे, प्रा. प्रशांत गुरव, डॉ. अस्मिता बुरगुटे, युसूफ सय्यद, अथर्व कुलकर्णी, डॉ. संजय सोनटक्के, मीनाताई महामुनी, चंदूबाई खंदारे, विजय गायकवाड, अविनाश मुंडे आदी उपस्थित होते.

प्रख्यात बासुरी वादक जगदीश सुतार यांच्या बासुरी वादकाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर कुमारी वसुंधरा संजय गुरव या मुलीने प्रस्तुत केलेले शिवचरित्र कथन ऐकून टाळ्यांच्या तुफान आला. मुकेश जाधव यांनी प्रस्तुत केलेला तबला जुगलबंदी आणि प्रख्यात गायिका शर्वरी डोंगरे यांनी राग बिहाग, भक्तीगीते आणि इतर गीत सादर केले. दुसऱ्या दिवशीही नागरीकांचा उत्साह प्रेक्षणीय होता. जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत धाराशिवकर सहकुटुंब सहपरिवार श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उपस्थित राहिले आणि विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.


महासंस्कृती महोत्सवात कु.वसुंधरा संजय गुरवचे कौतुक

महासंस्कृती महोत्सवात वसंधरा संजय गुरवने अतिशय उत्कृष्ट पध्दतीने “शिवचरित्र कथन“ केले. सर्व प्रेक्षकांनी तिचे टाळ्यांच्या कडकडात प्रतिसाद दिला. शिवचरित्र कथन या विषयांवर व्याख्यान दिल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी वसुंधरा हिचे तोंडभरुन कौतुक केले.


 
Top