धाराशिव (प्रतिनिधी)- मुंबई विधानभवन येथे निम्न तेरणा संघर्ष समितीने निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठी निधीला तत्काळ मंजुरी द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेतली . यावेळी अर्थमंत्र्यांनी संघर्ष समिती सदस्यांना बैठकीत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

गोदावरी पाठबंधारे महामंडळाअंतर्गत माकणी येथील 23 गावांना लाभ देणाऱ्या या योजनेचा प्रस्ताव तयार असून या गावातील शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केली आहे . धाराशिव तालुक्याचा संजीवनी ठरणारी ही योजना गेली अनेक वर्षापासून बंद आहे. यामुळे या भागात कायम दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे . संबंधित बाबी लक्षात आणून दिल्यानंतर अर्थमंत्र्यांनी या विशेष दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.यावेळी जगदीश पाटील, अण्णासाहेब क्षीरसागर, अरुण कोळगे, दीपक सूर्यवंशी, किशोर पाटील, अमर माने, सचिन सूर्यवंशी आणि संघर्ष समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.


 
Top