धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील जुनी गल्ली येथील रहिवासी माणिकराव मारुती बोधले यांचे शनिवार, दि.2 मार्च रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पांढरी स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. माणिकराव बोधले हे शेतकरी कामगार पक्षातील धडाडीचे कार्यकर्ते होते. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले. भाई उद्धवराव पाटील यांच्यासमवेत त्यांनी काम केले होते. दिवंगत न्यायमूर्ती बॅ.बी.एन. देशमुख यांचे स्वीय सहायक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. भोगावती सहकारी साखर कारखान्यातून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. नगर परिषदेचे कर्मचारी पवन बोधले यांचे ते वडील होत.


 
Top