धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन ज्या गावामध्ये शरीरा विरुध्द, मालमत्ते विरुध्द, महिला विरुध्द जास्त प्रमाणात गुन्हे घडले, शेतकरी अत्महत्या झाल्या. अशी 25 गावे गुन्हेगारी पासून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील सभागृहत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

 सदर बैठकी मध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गावातील पाणी टंचाई, जलयुक्त शिवार, आरोग्य व शिक्षण, पर्यावरण, वन विभाग, नर्सरी तयार करणे, आंधश्रध्दा निर्मुलन, सेंद्रीय शेती, फळबाग लागवड, भाजीपाला उत्पादन, सेंद्रीय भाजीपाला, फळे उत्पादक शेतकऱ्याचे पासपोर्ट, विविध प्रकारचे अन्नधान्य व फळे उत्पादक शेतकरी ग्रुप तयार करणे व शेतमाल विक्री करणे. तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या आडचणी, विद्युत, पाणी पातळी चेक करण्याचे ॲप, सोलार सिस्टीम, फुड प्रोसेसिंग, शेतीवर आधारित लघु उद्योग गावातील सामाजिक, जातीय विषय, ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे, गावो गावी सिसिटीव्ही बसविणे, गावा मध्ये खेळाचे आयोजन व साहित्य उपलब्ध करणे, लॉयब्ररी स्थापन करणे, पारधी  पिढी येथे जावून तेथील लहान मुलांना शिक्षण देणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी कृषी खात्यामार्फत शासनाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी राबविलेल्या उपक्रमास कृषी खाते सहभाग नोंदविल असे आश्वासन दिले.

सदर बैठकीस अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उप अधीक्षक स्वप्नील राठोड, संजय पवार, निलेश देशमुख, गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, बीट अधिकारी, तसेच कोव्हिजन फाउंडेशनचे दयानंद वाघमारे, टाटा सामाजि संस्थेचे गणेश चादरे व 25 विद्यार्थी, जिल्ह्यात कार्यरत एनजिओ, शेतकरी यांनी सहभाग नोंदवला. सदर उपक्रमामध्ये हरीरीने भाग घेवून व 25 गावे गुन्हेगारी मुक्त करुन एक उदाहरण तयार करुया असे सदर बैठकी मध्ये ठरविण्यात आले.


 
Top