धाराशिव (प्रतिनिधी)- काचबिंदु आजाराचे लक्षणे हे सहसा ओळखता येत नाही.तेव्हा रुग्णांनी वेळोवेळी तज्ज्ञामार्फत नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करणे गरजेचे आहे.या आजाराविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला यांनी केले.

जागतिक काचबिंदु सप्ताहाच्या निमित्ताने 14 मार्च रोजी आयोजित जनजागृती कार्यक्रमात डॉ.मुल्ला अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

शासकीय वैदयकीय महाविदयालय रुग्णालय,राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आणि जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने 10 ते 16 मार्च दरम्यान जागतिक काचबिंदु सप्ताह साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने 14 मार्च रोजी नेत्र विभाग येथे काचबिंदु सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.भालचंद्र यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.

प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योती कानडे यांनी काचबिंदु होण्याचे कारणे,काचबिंदु होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी, काचबिंदुचे समाजात वाढत असलेले प्रमाणे तसेच वय वर्ष 40 नंतर प्रत्येक व्यक्तीने व ज्या व्यक्तीला मधुमेह आहे,अशा व्यक्तीनी किमान सहा महिण्यातुन एकदा तज्ज्ञ डॉक्टरामार्फत डोळयांची तपासणी करुन घ्यावी.जेणेकरुन काचबिंदुचे लवकर निदान करुन त्यावर योग्य उपचार करुन काचबिंदुमुळे येणारे अंधत्व नियंत्रणात ठेवता येऊ शकते याबाबत मागदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला तसेच शासकीय वैदयकीय महाविदयालय व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व वैदयकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ व डॉ.नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.नेत्रविभागाचे प्रमुख नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ.महेश पाटील,डॉ.पवन महाजन,अधिसेविका सुमित्रा गोरे यांची तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी रामराजे बिडवे,निलेश कुरील, नेत्रविभागाचे इन्चार्ज वहिदा शेख सर्व नर्सिंग स्टाफ,समुपदेशक उमेश गोरे, रुग्णालयीन कर्मचारी व रुग्णालयात तपासणीकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संतोष पोतदार यांनी मानले.


 
Top