तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे विविध भागात सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सुरेश देशमुख,व पद्माकर फंड यांच्या हस्ते करण्यात आले.                                            

आ. राणाजगजितसिंह  पाटील  यांच्या प्रयत्नातून तेर येथील गोदावरी भागात सिमेंट काँक्रीट रस्ता 25 /15 या योजनेतून दहा लाख रुपये तर  मस्के प्लॉटिंग भागात  पाच लाख रुपये व विठ्ठलनगर भागात प्लॉटिंग दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,बालाजी पांढरे,राम कोळी, प्रवीण साळुंके, जुनेद मोमीन, मंगेश फंड, इंद्रजीत ढोबळे, कुंडलिक रसाळ,अशोक ढोबळे, प्रतिक नाईकवाडी, संजय लोमटे,तानाजी माने, तानाजी बंडे, नवनाथ पसारे, आर्शाद मुलानी, संदीप कचरे, अक्रूर ढोवळे, तानाजी मदने,तुकाराम धुमाळ आदी उपस्थित होते.


 
Top