धाराशिव (प्रतिनिधी)-समता कॉलनी येथील विकासकामांचा शुभारंभ माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे,  सुनील काकडे, शहराध्यक्ष अभय इंगळे, सुजित साळुंके, राहुल काकडे, राजाभाऊ कारंडे, संदिप साळुंके, संदिप इंगळे, व प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

नागरिकांच्या सोयीसाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कायम दक्ष असतील असे मत दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तर गेल्या अनेक वर्षांपासून समता कॉलनी येथील विकासकामांना खीळ बसली होती. मात्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे जवळपास साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.  प्रभागातील नागरिकांना यापुढे जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात मी व माझे सहकारी सुजित साळुंके कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास प्रभागातील नागरिकांना माजी पालिका गटनेते तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांनी दिला. यावेळी समर्थ हाजगुडे, निखिल शेरखाने, गणेश सावंत, प्रसाद मुंडे, यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होती.


 
Top