तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजप वर काहीही परिणाम होणार नाही मी मराठाच आहे ना  मराठ्यांना फक्त  भाजपच आरक्षण देणार असे प्रतिपादन केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन प्रचंड बंदोबस्तात श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी राम छञे यांनी केले. 

त्यानंतर पञकारांशी बोलताना म्हणाले  पुढे नारायण राणे म्हणाले कि, मला माझ्या कुंटुंबाला देविने भरभरुन दिले आहे. त्यामुळे मी फक्त देविला भाजप चारशे पार होवु दे व देश व राज्यातील जनतेची सेवा करण्याची मला संधी दे व माझ्यातील माणुसकी कायम राहू दे असे साकडे घातले. मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजप वर परिणाम होईल का अशा प्रश्न केला असता मी मराठा आहे. कमी जास्त नाही पुर्ण शहान्नव कुळी मराठा आहे असे यावेळी म्हणाले. केंद्रीय मंञी नारायण राणे यांच्या दौरा बाबतीत गुप्तता राखण्यात आली होती. ते हेलिकँप्टरने ते आल्याने त्यांच्या दौरा उघड झाला. हेलिपँडवर त्यांचे स्वागत राजसिंह निंबाळकर, सचिन पाटील, संतोष बोबडे, आनंद कंदले, शांताराम पेंदे, पारधे यांनी केले.


 
Top