तुळजापूर (प्रतिनिधी) -  तुळजाभवानी देवीचे अतिप्राचीन दागदागिने, मौल्यवान वस्तू व 71 पूरातन नाणी याचा काळा बाजार, चोरी झाल्या प्रकरणी खालील नमूद व्यक्तीची नाकों टेस्ट करण्याचे आदेश आपण त्वरीत देण्याची कृपा करावी. जेणेकरून आई तुळजाभवानीचा भक्तांना  न्याय मिळू शकेल. अशी मागणीचे निवेदन  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मार्फत किशोर गंगणे व अँड शिरीष कुलकर्णी यांनी निवेदन देवुन केली.

निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्राची कुलसयामिनी आई तुळजाभवानी देवीचे ऐतिहासिक, अतिप्राचीन, मौल्यवान दागदागिणे, मोल्यवान वस्तू, राजेमहाराजे यांनी दिलेले 71 अति मौल्यवान नाणी याचा काळाबाजार, चोरी झाल्याचे आपणास व सर्व महाराष्ट्रातील जनतेस ज्ञात आहे. त्यामुळेच आपण विधानसभेत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश आपल्या यंत्रणांना दिलेत. त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन.

सदरची चौकशी उस्मानाबाद येथील माननीय पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख याच्या प्रामाणिक सर्वागीण चौकशीमुळे प्रकरण पुढे जात आहे. परंतू एक आरोपी 4 महिन्यांपासून फरार आहे. तो पोलिसांना सापडत नाही हे पोलिसाचे अपयश आहे असे आम्हास वाटते. त्यामुळे आम्ही या निष्कर्षास पोहचले आहेत की यामध्ये खरे दोषी कोण आहेत? याची उकल होण्याकरिता नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याशिवाय सदर प्रकरणास एक वेगळे व योग्य  वळण  लागणार नाही व त्यात पोलिसांनाही मदत होणार आहे.खालील नमूद लोकांची नार्को टेस्ट करण्यात यावी.

सतिश राऊत तत्कालीन तहसीलदार तुळजापूर तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर ( मंदिरात व्यवस्थापक म्हणून 5 वर्ष काम पाहिलेले 2001 ते 2005 सध्या शासकीय सेवेत सामिल. दिलीप देविदासराव नाईकवाडी (शैक्षणिक पात्रता कोणतीही नाही, पूर्ण नोकरी ही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते व्यवस्थापक धार्मिक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर सेवा संपल्यानंतरही 3 वर्ष बेकायदेशीरपणे मुदतवाढ देऊन सेवेमध्ये पुन्हा घेण्यात आले. अर्जदार यांच्या तक्रारीनंतर शासनाने आदेश देऊन गुन्हा नोंद झाला व 4 ते 5 महिने जेलमध्ये रवानगी. सध्या जामीनीवर आहेत.

महंत चिलोजीबुवा, गुरु हमरोजीबुवा.श्री तुळजाभवानी मंदिरातील शासनाने मुन्तखबमध्ये दिलेल्या अटींवर सेवा करणारे व यांच्यावर देवीच्या संपूर्ण जामदारखान्याची (खजिन्यांची) जबाबदारी आहे. सदर जामखान्याची एक चावी कायम महंताकडेच असते. सर्व साधारणपणे 40 ते 50 वर्षापासून श्री तुळजाभवानी मंदिरात कार्यरत आहेत. श्री तुळजाभवानी देवीच्या सर्व दागदागिण्यांची जबाबदारी त्यांचेवर आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या दागदागिण्यांच्या काळा बाजार व चोरी प्रकरणात दोन ते तीन महिने झाले ते अद्यापही फरारी आहेत, त्यांचा ते मुख्य आरोपी आहेत.


 
Top