धाराशिव (प्रतिनिधी)- गोमांसाची वाहतूक करणाऱ्याविरूध्द परंडा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वाहन आणि गोमांस असा एकुण 8 लाख 86 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

परंडा शहरात व परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्याविरुध्द परंडा पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. यापुर्वी परंडा पोलीसांच्या पुढाकारातुन परंडा येथील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते. चोरुन लपवून गोवंश जनावरांची कत्तल होत असल्यास त्याबाबत गोपनीय माहिती मिळविण्याकरीता गोपनिय यंत्रणा सक्रिय करण्यात आलेल आहे. याचाच एक भाग म्हणून दि.25.03.2024 रोजी परंडा पोलीसांना प्राप्त गोपनीय माहितीनुसार गोमांसाची वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडण्यास यश आले आहे. जुने तहसिल कार्यालयासमोर सापळा रचून गोमांसाची वाहतुक करणारे वाहन पकडण्यात आले. सदरील वाहनावर वाहन क्रमांक एमएच 42 बीएफ 2660 नमुद आहे. वाहन चालक इम्रान मशीर शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहन चालकाकडे आणखी साखेल चौकशी केली असता त्याने सागिंतले की, तो स्वत: बिगवन येथील रहिवासी असुन आजूबाजूच्या परिसरातुन जिवंत जनवरे विकत घेतली जातात. त्यानंतर ती जनावर परंडा येथे आणली जातात. परंडा येथे आल्यावर शाहबाज अजीज सौदागर यांच्या अवैध कत्तलखान्यावर त्या जनावरांची कत्तल केली जाते. चौकशीमध्ये आतापर्यंत दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सर्व आरोपींविरुध्द गुरनं 66/2024 अन्वये कलम 429 भ.द.वि.सं. सह कलम 5(सी), 9(ए) महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरील गुन्ह्यात वाहन आणि गोमांस असा एकुण 8 लाख 86 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री किरण घोंगडे करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी भुम गैरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार,  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कवताि मुसळे, पोलीस उप निरीक्षक किरण घोंगडे, पोलीस हावलदार फिरोज शेख, महिला पोलीस हावलदार पायाळे, पोलीस नाईक नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार सुर्यजीत जगदाळे, श्रीकांत गायकवाड, डिकोळे यांचे पथकांनी केली आहे.


 
Top