धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील माजी विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील होत्या.
यशस्वी विद्यार्थी लेखा वित्त अधिकारी रोहन शिवाजीराव जाधव, पुणे महापालिकेत टाउन प्लॅनिंग अभियंता साकेत पंखे, तलाठी रोहन तोवर या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रशासकीय अधिकारी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव, आदित्य पाटील, मुख्याध्यापक श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव साहेबराव देशमुख, सौ.मंजुळाताई आदित्य पाटील, प्राचार्य के.टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी धाराशिव डॉ. अमोल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील यांनी आपल्या भाषणात विचार व्यक्त करत असताना एम.पी.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. त्याचा नक्कीच फायदा समाजाला होईल. प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना शाळेने दिलेल्या संस्काराचा विसर न पडू देता आपण समाजाची सेवा केली पाहिजे. श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम विद्यार्थी घडवणारी शाळा आहे. आज पर्यंत संस्थेचे अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. तर याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.